कोल्हापूर -कोल्हापूरचे माजी आमदार बाबूराव धारवाडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काल (गरूवारी) रात्री 10 वाजता निधन झाले.
कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून 1942 ते 1946 मध्ये स्वातंत्र्य चळवळीत बाबुराव धारवाडे यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस (आय) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी सलग 11 वर्षे त्यांनी कार्य केले. 1985 साली महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची कोल्हापूर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवड झाली.
बाबुराव धारवाडे हे परम शाहू भक्त होते. त्यांच्या प्रयत्नाने संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा राहिला आहे.
COMMENTS