कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील हेल्मेटसक्तीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. हेल्मेटसक्तीसंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती दिली.
15 जुलैपासून कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये शहाराअंतर्गत हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला सर्वपक्षीयांनी विरोध केला होता. त्याबाबत आज सर्वपक्षीयांनी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन, चर्चा केली. वाहनचालकांचं हेल्मेट वापरण्याबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून, हळूहळू सक्ती करण्याचं या बैठकीत ठरले आहे.
COMMENTS