कोल्हापूर : जि. प. अध्यक्षसाठी शौमिका महाडिक तर उपाध्यक्ष शिवसेनेचे सर्जेराव पाटील यांची नावे जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता राजकिय वर्तुळात महत्वाच्या घडामोडी होत आहेत. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापण्यासाठी आता भाजप, शिवसेना व काही आघाड्यानी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या एका बैठकीत अध्यक्ष भाजपाचा तर उपाध्यक्ष शिवसेनेचा ( नरके गट ) असा निर्णय जाहीर करण्यात आला. तशा सुचनाही सर्व नुतन जिल्हा परिषद सदस्याना देण्यात आल्या आहेत. यानुसार आता अध्यक्षपदासाठी शौमिका महाडीक तर उपाध्यक्ष पदासाठी सर्जेराव पाटील अशी नावे आघाडीवर असुन याच नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. हे चित्र स्पष्ट झाले आहे. या बैठकीस महसुलमंत्री चंद्रकांत( दादा ) पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील सरूडकर,हिंदुराव शेळके, राहुल आवाडे यांच्यासह पदाधिकारी व नुतन जि. प. सदस्य उपस्थीत होते.
COMMENTS