कोस्टल रोडला नाव देण्यावरुन शिवसेनेची कोलांटउडी !

कोस्टल रोडला नाव देण्यावरुन शिवसेनेची कोलांटउडी !

मुंबई –  दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरापर्यंतचा प्रवास सुस्साट करणाऱ्या मुंबईतील कोस्टल रोडला नाव देण्यावरुन शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण निर्मिण झाले आहे. स्नेहल आंबेकर या महापौर पदावर असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची मागणी केली होती. यासंर्दभात त्यांनी मुख्यमंत्र्यांना 2015 मध्ये पत्र ही दिले होते. मात्र आता  कोस्टला रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, स्नेहल आंबेकर यांनी असे पत्र दिल्याची माहिती नसल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच म्हणणे आहे. यावरुन बाळासाहेबांचे नाव देण्याच्या मागणीवरून शिवसेनेने कोलांटउडी घेतली आहे असंच म्हणावे लागेन.

 

 

 

COMMENTS