खरंच सोनम कपुरला राष्ट्रगीत येत नाही ?

खरंच सोनम कपुरला राष्ट्रगीत येत नाही ?

बॉलिवूडची सौंदर्यवती सोनम कपूर आपली रोखठोक मते व्यक्त करण्यात प्रसिद्ध आहे. आपण केवळ सौंदर्याची खाण नसून आपण वैचारिकदृष्ट्याही परिपक्व असल्याचं तिनं अनेकवेळा दाखवून दिलंय. एका इंग्रजी पेपरला दिलेल्या मुलाखतीमध्ये तीनं आपली सडेतोड मते मांडली आहेत. मात्र या मुलाखतीमधील एक भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि त्यावरूचन तिच्यावर ट्विरवरुन चौफेर टीका झाली. ती मुलाखतीमध्ये म्हणते

“I’m a proud Indian. I love my country but for some of you – and you’re the bigots, not me – I become ‘anti-national’ only because I ask questions or choose to be critical. Listen to the national anthem one more time. Recall the line you heard as kids, ‘Hindu, Muslim, Sikh, Issai…'”

“मी माझ्या देशावर प्रेम करते, मात्र काही लोकांसारखी कट्टरवादी नाही.

मी प्रश्न विचारते, टीका करते म्हणून मला राष्ट्रविरोधी ठरवले जाते.

पुन्हा एकदा राष्ट्रगीत ऐका. लहानपणी असताना ऐकलेल्या त्या ओळी पुन्हा आठवा हिंदु मुस्लिम, शिख, इसाई….”

 

या मुलाखतीवरुन सोनमवर जोरदार टीका झाली. तीला राष्ट्रगीत येत नाही असं समजून तिची खिल्ली उडवण्यात आली. तिच्यावर वेगवेगळे टीका टीप्पणी करण्यात आली. खरंतर वरील लेखात राष्ट्रगीतामध्ये हिंदु, मुस्लिम, शिख, इसाई या ओळी आहेत असा अर्थ अजिबात निघत नाही. तरीही तिला राष्ट्रगीत येत नाही म्हणून ट्विटरवर ट्रोल करण्यात आलं. राष्ट्रगीत ऐका आणि त्या ओळीही आठवा असं ती म्हणत असतानाही त्याचा चुकीचा अर्थ घेऊन सोनमला टार्गेट करण्यात आलं.

COMMENTS