खासदार अपमान प्रकरणी दोन कर्मचारी निलंबित !

खासदार अपमान प्रकरणी दोन कर्मचारी निलंबित !

दिल्ली – महाराष्ट्र सदनात भाजपचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सदानातील कॅन्टीच्या दोन कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.  तसंच कॅन्टिनचा चालक दर्शन पांडे याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्र सदन निवासी आयुक्तींनी ही कारवाई केली आहे. खासदार गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने त्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS