खा. रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी मागे घेण्याची शक्यता – सूत्र

खा. रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी मागे घेण्याची शक्यता – सूत्र

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर करण्यात आलेली विमानबंदी आज मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.  खा. रवींद्र गायकवाड लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र देणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.

 

यापुढे पुन्हा असं वर्तन होणार नाही अशा आशयाचं पत्र गायकवाड लोकसभा अध्यक्षांना देणार असल्याचं समजतं आहे. या पत्रानंतर त्यांच्यावर घालण्यात आलेली हवाई बंदी उठवण्याची घोषणा होऊ शकते. खा. रवींद्र गायकवाड यांच्यावर लावण्यात आलेलं 308 हे कलम वगळण्यासाठीही गृहमंत्री राजनाथ सिंह सकारात्मक असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, हे कलम हटवण्यासाठी थोडा वेळा लागणार आहे.

COMMENTS