सातव्या वेतन आयोगात शिफारस करण्यात आलेल्या भत्तावाढीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सेवेत असलेल्या व निवृत्त झालेल्या अशा एकुण 50 लाख कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.
आयोगाच्या प्रामुख्याने केलेल्या शिफारशीमध्ये कर्माचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासह इतर भत्यांमध्ये वाढ करण्याबाबत सुचना करण्यात आली होती. ही सुचना सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता घसघशीत वाढ होणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचाऱयांना थेट लाभ मिळणार आहे. सातवा वेतन आयोगाचा भत्ता मिळावा यासाठी केंद्रीय कर्मचाऱयांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अर्थ मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावर कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावाला कॅबिनेटने मान्यता दिली आहे. केंद्राच्या या निर्णयाने केंद्रीय कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
COMMENTS