मुंबई – एसटी महामंडळातील 70 टक्के महिला कंडक्टरांचे गर्भपात होत असल्याच्या एका अहवालाने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचं वृत्त महापॉलिटिक्ससह अनेक माध्यमांनी दिलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन महिला कंडक्टर्सना गरोदरपणाच्या कालावधीमध्ये डेस्क वर्क देण्याची मागणी केली आहे. यावर परिवहनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.
COMMENTS