गांधी घराण्यात मनोमिलन, संजय गांधी पुत्र वरुण गांधी काँग्रेसमध्ये परतणार ?

गांधी घराण्यात मनोमिलन, संजय गांधी पुत्र वरुण गांधी काँग्रेसमध्ये परतणार ?

तब्बल तीन दशके काँग्रसपासून दूर राहिलेल्या दिवंगत संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. वरुण गांधी यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. या भेटीच्यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी याही उपस्थित असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या मनेका गांधी या मोदी सकारमध्ये मंत्री असल्या तरी त्यांना साईडलाईन केलं असल्याचं बोललं जातंय. त्यातच वरुण गांधी यांना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रोजेक्ट करण्याचं आश्वासन भाजप आणि आरएसएसनं दिलं होतं. ते पाळलं नसल्याचं वरुण गांधी यांचा आरोप आहे. त्यामुळेच ते भाजपवर नाराज आहेत. उत्तर प्रदेशात आता यापुढे आपल्याला भाजपमध्ये फारसं भवितव्य नसल्याची जाणीव वरुण यांना झाली आहे. तर सोनिया आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसची उत्तर प्रदेशात वाताहात झाली आहे. त्यामुळे वरुण सारखा नेता काँग्रेसमध्ये आल्यास त्याचा फायदा होईल असं त्यांना वाटतंय. त्यामुळे वरुण गांधी यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास गांधी  कुटुंबातील कोणत्याही सदस्याची ना नाही. त्यामुळे वरुण गांधी यांचा लवकरच  काँग्रेसमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.  वरुण काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांच्यात किती ताळमेळ राहतो आणि ते किती काळ काँग्रेसमध्ये राहतात हे आता पहावं लागणार आहे.

COMMENTS