गायींबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे – जया बच्चन

गायींबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे – जया बच्चन

देशातील महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून समाजवादी पार्टीच्या खासदार अभिनेत्री जया बच्चन यांनी आज केंद्र सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. ‘गायींना वाचवण्यासाठी इतकं सगळं करता, मग स्त्रीयांना वाचविण्यासाठीही पावलं उचला,’ अशा शब्दात जया बच्चन यांनी केंद्रसरकारवर हल्लाबोल केला. महिलांवर होत असलेले अत्याचार कमी होताना दिसत नाही यावर यावर युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

जया बच्चन यांनी महिलांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सभागृहातील अनेक सदस्यांनी बाक वाजवून त्यांना समर्थन दिले. गेल्या काही दिवसांपासून गो हत्या बंदी कायद्यावरून देशांत मतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संपूर्ण देशभरात गो हत्या बंदी कायदा करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे गायीचे संरक्षण करणाऱ्या गोरक्षकांकडून होत असलेल्या हिंसाचारावर मोठी टीका होताना दिसत आहे. याप्रश्नी आपले मत मांडताना जया बच्चन यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही महत्वाचे असल्याचे केंद्र सरकारला ठणकावून सांगितले. या आधीही त्यांनी दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणावर संसदेला धारेवर धरले होते.

COMMENTS