पुणे – पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकांऊट तयार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऋतुराज नलवडे (वय 30 रा. जुन्नर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. बापट यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करुन या तरुणाने त्यावर अश्लिल फोटो अपलोड केले होते. याप्रकरणी पकडलेल्या तरूणाने सायबर विभागाला गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री बापट यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन या तरूणाने त्यावर महिलांची अश्लिल छायाचित्र अपलोड केली होती. हा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला होता. या प्रकरणाची तक्रार बंडगार्डन पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार सायबर विभागाच्या पथकाने फेक अकाऊंट तयार करणाऱ्या तरुणाला जुन्नर येथून अटक केली. त्यांने गिरीश बापट यांच्या अधिकृत अकांऊटवरुन त्यांचे फोटो घेऊन त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले. या अनधिकृत फेसबुक अकांऊटला ना. गिरीश बापट असे नावही या तरुणाने दिले होते. यापूर्वी त्याने 17 इतर नावाची फेक अकाऊंट तयार केली होती. अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
COMMENTS