पुणे – पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर महापालिकेची पोटनिवडणूक होत आहे. मुंढवा घोरपडी या भागातील ही जागा आहे. या जागेवर आरपीआय आणि भाजप युतीकडून नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमाली कांबळे यांना तिकीट देण्यात आलंय. पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हिमाली ही बीकॉमच्या तृतीय वर्षात शिकत आहे. ही पोटनिवडणूक उपमहापौर यांच्या निधनामुळे होत आहे. नवनाथ कांबळे यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रय़त्न करणार असल्याचं पालकमंत्री गिरीष बापट यांनी सांगितलं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचीही भेट घेणार असल्याचं बापट यांनी सांगितलं. येत्या 11 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे.
COMMENTS