सांगली – महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या बंधूच्या नावावरील 80 लाखांचे कर्ज माफ करण्यात आले होते, असा गंभीर आरोप जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. याचे तीव्र पडसाद आज (शुक्रवारी) तासगाव तालुक्यात उमटले. आर.आर आबांची कन्या स्मिता यांनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी यासंदर्भातील पुरावे द्या, अन्यथा अंजणीत येऊन आबांच्या समाधीजवळ माफी मागा असे आव्हान मंत्री महाजन यांना स्मिता यांनी दिले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री महाजन यांनी हा खळबळजनक आरोप केला होता. स्वच्छ चारित्र्यासाठी राजकीय वर्तुळात आर.आर आबांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्यावर असे गंभीर आरोप झाल्याने त्याची सत्य पडताळणी करण्यात यावी, अशी चर्चा सुरु झाली.
दरम्यान, आमदार विजय वडेट्टीवार यांनी मागील आघाडी सरकारच्या काळात दिेलेल्या कर्जमाफीत युतीच्या अनेक नेत्यांची कर्जे माफ झाली होती, असा दावा त्यांनी केला होता. या वर उत्तर देताना मंत्री महाजन यांनी आर. आर यांच्या बंधूच्या कर्जमाफीचा मुद्दा पुढे आणला होता. महाजन यांनी याबाबत पुरावे असल्याचा दावाही केला आहे.
COMMENTS