‘गुगल’ला 242 कोटी युरोंचा दंड

‘गुगल’ला 242 कोटी युरोंचा दंड

इंटरनेटवर प्रतिस्पर्धी उत्पादने आणि सेवां डावलून आपल्या उत्पादनाना प्राधान्य दिल्याप्रकरणी युरोपियन युनियनने गुगलला 242  कोटी युरोंचा दंड ठोठावला आहे.  EU च्या नियामक समितीच्या या  कारवाईमुळे गुगलला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

समुदायाच्या नियामक समितीच्या या कारवाईमुळे गुगलला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. सध्याच्या घडीला इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधण्यासाठी गुगल हे सर्च इंजिन सर्रासपणे वापरले जाते. त्यामुळे हे सर्च इंजिन बरेच लोकप्रिय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गुगलकडून स्वत:ची उत्पादने आणि सेवांना प्राधान्य देण्यासाठी सर्च इंजिनमध्ये काही फेरफार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. याद्वारे गुगलकडून सर्च इंजिनमध्ये इतर उत्पादनांची माहिती दडवून स्वत:ची उत्पादने आणि सेवांना मोक्‍याची जागा दिली जाते. या कारवाईमुळे गुगलची पॅंरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटला मोठा झटका बसला आहे.

अमेरिकेच्या येल्प, ट्रिप ऍडव्हाईझर, इंग्लंडच्या फाऊंडेम आणि फेअर सर्च या कंपन्यांनी गुगलविरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या सात वर्षांपासून या संदर्भातील तपास सुरू होता. गुगलने येत्या तीन महिन्यांत सर्च इंजिनमध्ये फेरफार करणे थांबवावे, असा इशाराही देण्यात आला आहे. अन्यथा अल्फाबेट कंपनीला दिवसाकाठी मिळणाऱ्या जागतिक उत्त्पन्नाच्या 5 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.

COMMENTS