गुगलसम्राट सुंदर पिचाई यांना मिळतो अब्जावधीत वेतन

गुगलसम्राट सुंदर पिचाई यांना मिळतो अब्जावधीत वेतन

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या सीईओ सुंदर पिचाई यांच्या वेतन किती असेल! याचा तुम्ही कधी विचार केला  आहे का? नसेन ना, त्यांचा वर्षाकाठचा पगार ऐकूण सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का बसेल. कारण पिचाई यांचा वार्षिक पगार तब्बल 200 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1285,51,00,000 (12.85 अब्ज) रुपये आहे. वेतन म्हणून इतकी मोठी रक्कम असलेले सुंदर पिचाई हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत.

2016 या वर्षांत पिचाई यांना पगार व अन्य भत्त्यांच्या स्वरूपात तब्बल 12.85 अब्ज रुपये मिळाले आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट असून सरासरी काढल्यास महिन्याला त्यांना 100 कोटी मिळाले आहेत.

सीईओपदी मिळालेली बढती आणि गुगलच्या अनेक नव्या सेवा यशस्वीरित्या सुरू केल्याबद्दल पिचाई यांना हा भरगच्च पगार देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गुगलचा जाहिरात आणि यू ट्यूब व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तसंच, कंपनीला मशिन लर्निंग, हार्डवेअर व क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातही गुंतवणूक करणं शक्य झालं आहे. या सगळ्यामुळं त्यांच्या पगाराचा आकडा वाढला आहे.

COMMENTS