सूरत – विधानसभा निवडणुकीआधीच गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. शंकरसिंह वाघेला यांनी मागच्या आठवडयात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पक्षामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. गुजरात विधानसभेतील काँग्रेसच्या तीन वरिष्ठ आमदारांनी आज भाजप मध्ये प्रवेश केलायं. गुजरातचे आमदार व्हीप बलवंतसिंह राजपूत, पीआय पटेल आणि तेजश्री पटेल यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य व्हीप बलवंतसिंह राजपूत यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून, पुढच्या महिन्यात होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. शंकरसिंह वाघेला यांचे निकटवर्तीय असलेल्या राजपूत यांना भाजपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना राज्यसभेवर जाण्यापासून रोखण्यासाठी भाजपा बलवंतसिंह राजपूत यांना पाठिंबा देऊ शकते. अहमद पटेल यांचा पराभव झाल्यास तो फक्त प्रतिष्ठेचा विषय नसेल तर, वर्षअखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्य खच्ची होईल. त्यामुळे भाजपा शंकरसिंह वाघेल यांच्या उमेदवाराला समर्थन देण्याची शक्यता आहे.
पीआय पटेल आणि तेजश्री पटेल या दोन काँग्रेस आमदारांनी आज राजीनामे दिले. राज्यसभेसाठी जेव्हा काल अहमद पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी तेजश्री पटेल तिथे उपस्थित होत्या. गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील आकडेवारीमुळे भाजप दोन जागा सहज जिंकेल असं दिसतयं.
Gujarat Congress MLAs Balwantsinh Rajput, P I Patel and Tejashree Patel join BJP pic.twitter.com/qLJj4ZAjlb
— ANI (@ANI_news) July 27, 2017
COMMENTS