काही अपवाद वगळता भाजपचा सुसाट निघालेला वारु गुजरातमध्येही सुसाट धावण्याची शक्यता आहे. एका सर्व्हेनुसार भाजपला गुजरात विधानसभेतच्या 182 जागांपैकी तब्ल 144 ते 152 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला फक्त 26 ते 32 जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज, लोकनिती आणि सीएसडीस यांनी हा सर्व्हे केला आहे.
2012 मध्ये भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 61 जागा मिळाल्या होत्या. त्याच्या तुलनेत भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या जागा निम्म्या जागा कमी होण्याचा अंदाज आहे. गुजरातच्या सर्वच भागात भाजपला चांगलं यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वर्षाअखेर गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
आरक्षणासाठी पटेलांचे आंदोलन, मोदींच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांची बेताचीच कामगिरी याचा काहीही परिणाम भाजपच्या यशावर होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील झालेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला पुन्हा विजयी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तशीची परिस्थिती गुजरातमध्ये भाजपसाठी आहे. दोन्ही राज्यात सत्ताधा-यांच्या बाजुने कौल असल्याचं सर्व्हेवरुन दिसत आहे.
COMMENTS