गुजरातमध्ये राहुल गांधींची नवी प्रचार नीती, मोदी- शहांना करणार नाही टार्गेट ?

गुजरातमध्ये राहुल गांधींची नवी प्रचार नीती, मोदी- शहांना करणार नाही टार्गेट ?

अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी काल दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे गुजरातमधील नेते यांच्यासोबत चर्चा केली. यामध्ये गुजरातमध्ये प्रचाराची रणनिती ठरवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टार्गेट करणार नाही. तर राज्य सरकार, मुख्यमंत्री विजय रुपानी, मंत्री मंडळातील त्यांचे सहकारी, त्यांचे गैरव्यवहार आणि स्थानिक प्रश्न यावरच काँग्रेसच्या प्रचाराचा फोकस राहणार असल्याचं समतंय. 

गुजरातच्या निवडणुक प्रचारात मोदी शहांच्या यशाचा पाढा भाजपकडून वाचला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सरकारचे अपयश झाकलं जाऊ शकतं. त्यामुळेच त्यामुळे मोदी शहांना टार्गेट करण्याच्या ऐवजी राज्य सरकारच्या अपयशावर काँग्रेसच्या प्रचाराचा भर राहणार आहे. जर भाजपकडून सातत्याने मोदी शहांच्या यशाचा पाढा वाचला गेला तरच काँग्रेसकडून त्याला उत्तर द्यायंच अशी रणनिती ठरवण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राहुल गांधी हे सप्टेंबरमध्ये गुजरातमध्ये प्रचार सभा घेणार असल्याचंही कळतंय. प्रचाराच्या नियोजनासाठी काही खाजगी कंपन्याही नियुक्त केल्या जाणार आहेत. मात्र त्याचे पूर्ण अधिकार हे राज्य काँग्रेसला देण्यात आले आहेत. आदिवासी  पट्ट्यात मोठ्या जाहीर सभा आयोजित करण्याचाही काँग्रेसचा विचार आहे.

COMMENTS