गुजरात दंगलप्रकरणी मोदींच्या क्लीन चिटवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

गुजरात दंगलप्रकरणी मोदींच्या क्लीन चिटवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

2002 सालच्या गुजरात दंगलप्रकरणी  नरेंद्र मोदी यांना दिलासा मिळाला आहे. गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्यासह इतर 57 जणांनी कट रचला होता. त्याची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलासा मिळाला आहे.

झाकिया जाफरी व सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतच्या सुनावणी दरम्यान, न्यायाधीश सोनिया गोकाणी यांनी नमूद केले, गुलबर्ग सोसायटी हत्याप्रकरणी कट-कारस्थान होते का हा प्रश्न विशेष न्यायालयाने व्यवस्थित हाताळला आहे. न्यायालयाने निर्णयाच्या विरोधात दाद मागण्याचा मार्ग मोकळा ठेवला आहे.

COMMENTS