सुरत – गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गुजरात प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी आगामी विधानसभा निवडणुक राष्ट्रवीदा काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं सांगत. सुरतमधील 3 जागांसह राज्यातल्या 60 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उतरवणार आहे. पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटेल यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान गुजरातमधील पादीदार समाजाचा भाजपवरचा रोष चांगलाच वाढताना दिसतोय. गुजरातमध्ये भाजपनं गौरव यात्रा सुरु केली आहे. त्यावर पाटीदार समजातर्फे अनेक ठिकाणी त्याच्याविरोधात पोस्टर लावली आहेत. ही गौरव यात्रा नाही तर कौरव यात्रा आहे अशी टीका त्यावर करण्यात आली आहे. तसंच पोटस्टरमधून भाजपला काही सवाल करण्यात आले आहेत. गौरव कशाचा, पाटीदारांवर गोळीबाराचा, व्यापा-यांवर लाठीमाराचा की दलितांवरी अत्याचाराचा असे सवाल भाजप सरकारला विचारण्यात आले आहेत.
COMMENTS