गॅस, पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांनी काढला तिरडी मोर्चा

गॅस, पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या महिलांनी काढला तिरडी मोर्चा

सांगली- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात सांगलीमध्ये तिरडी मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीने हा मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. केंद्र सरकारच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरामध्ये गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होत. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने रस्त्यावर उतरत आंदोलन केले.

गॅसच्या दरामध्ये 87 रुपयांची वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ महिला आघाडीकडून गॅस सिलेंडरचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त महिलांनी भाजप सरकारच्या दरवाढ धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ऐन सणासुदीच्या काळात केलेली ही दरवाढ अन्यायकारक असल्याने सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विनया फाटक यांनी केली.

COMMENTS