भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. मेघालयमधील भाजपाच्या आणखी एका नेत्याने राजीनामा दिली आहे. गोमांस बंदीवरुन एकाच आठवड्यात हा पक्षातील दुसरा राजीनामा आहे. याआधी वेस्ट गारो हिल्सचे जिल्हाध्यक्ष बर्नार्डर माराक यांनी बीफ बॅनला विरोध करण्यासाठी राजीनामा दिला होता.
‘गारोमधील लोकांच्या भावनांसोबत मी तडजोड करू शकत नाही. या जिल्ह्याचा नागरीक असल्याने येथील लोकांच्या हिताचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. बीफ खाणं आमची संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. भाजपची बेकायदेशीर विचारसरणी आम्ही स्विकारणार नाही’, असं मत बाचू माराक यांनी व्यक्त केले आहे.
बाचू माराक यांनी भाजपाचे प्रदेश युनिट अध्यक्ष शिबुन लिंगदोह यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. नुकतंच मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गारो हिल्समध्ये बीफ पार्टीचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर भाजपा पक्षातून तीव्र टीका झाली होती. भाजपाचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी बाचू यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारासुद्धा दिला होता. भाजपचे नेते बाचू यांनी फेसबुकवरून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं.
COMMENTS