गोरखपूर येथे घडलेल्या घटनेबाबत दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. हा एका रुग्णालया संदर्भातील प्रश्न आहे. यामुळे संबंधीत राज्यातील उच्च न्यायालयात हे प्रकरण न्यावे, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. गोरखपूरमधील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयालात ऑक्सिजन पुरवठ्या आभावी 63 मुलांना मृत्यू झाला होता. या प्रकरणी उत्तर प्रदेश राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावाही घेतला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन आदित्यनाथ यांनी दिले आहे.
वकील राजश्री रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळत हा एक रुग्णालय आणि एका जिल्ह्यापूरता मर्यादीत विषय आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री स्वतः रुग्णालयात जाऊन लक्ष घालत आहेत, हे आम्ही टी. व्ही.वर पाहिले आहे. तेव्हा या संदर्भात संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयात हे प्रकरण न्यावे, असे न्यायालयाने म्हटलं आहे .
COMMENTS