गोव्यातील राज्यसभेसाठी मतदान पूर्ण

गोव्यातील राज्यसभेसाठी मतदान पूर्ण

गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मतदान सुरु पूर्ण झाले आहे. भाजप आघाडीतर्फे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर तर काँग्रेसतर्फे विद्यमान राज्यसभा सदस्य तथा प्रदेश काँग्रस अध्यक्ष शांताराम नाईक निवडणूक रिंगणात आहेत. सर्व  38 आमदारांनी मतदान केलय पण सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया  चालणार आहे. त्यानंतर लगेच निकाल जाहिर केला जाणार आहे. क्रॉस व्होटिंग होऊ नये यासाठी भाजप आघाडी आणि काँग्रेसतर्फे खास निवडणूक एजंटांची नियुक्ति करण्यात आली आहे.
भाजप आघाडीतर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि काँग्रेस तर्फे विद्यमान राज्यसभा सदस्य तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक निवडणूक रिंगणात आहेत. विध्यमान भाजपा आघाडीकडे आमदारांची संख्या जास्त असल्याने भाजपच्या विनय तेंडुलकर यांचा विजय निश्चित मानला जातो.

 

COMMENTS