गोव्यात काँग्रेस -भाजप कार्यकर्ते  भिडले !

गोव्यात काँग्रेस -भाजप कार्यकर्ते भिडले !

पणजी (गोवा) –   पणजी मतदारसंघातील टोंक-करंजाळे येथील भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मतदान केंद्र क्रमांक 28 वर मतदार मार्गदर्शन स्टॉल लावण्यावरुन हा वाद झाला.

भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि नगरसेविका शीतल नाईक यांनी जबरदस्तीने काँग्रेसच्या स्टॉल वरील मतदार याद्या घेऊन जाताना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने याप्रकरणी कुंकळ्येकर आणि नाईक यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील नोंदवली आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, कॉंग्रेसचे उमेदवार कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर आणि गोवा सुरक्षा मंच या पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर हे उमेदवार रिंगणात आहेत.

COMMENTS