पणजी – अखेर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. 40 सदस्यांच्या विधानसभेत मनोहर पर्रीकरांना भाजपासह इतर पक्षाच्या 22 आमदारांनी विधानसभेत पाठिंबा देत विश्वासदर्शक ठराव जिंकला. गोवा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी काँग्रेसला 16 आमदारांनी तर भाजपला 22 आमदारांनी आपला पाठिंबा जाहीर केला.
याआधी काँग्रेसने पर्रीकरांना दोन दिवसांचे मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. मात्र भाजपचे १३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांचे प्रत्येकी ३, गोवा फॉरवर्ड पार्टी, तसेच अपक्ष रोहन खौंटे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष गोविंद गावडे यांच्या पाठिंब्यानंतर भाजपने सत्तेच्या स्पर्धेत काँग्रेसला धूळ चाटविली आहे.
गोव्यात काँग्रेस १७ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता, मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांनी कोणत्याही हलचाली केल्या नसल्याचा आरोप त्यांच्याच आमदारांनी नंतर केला होता.
COMMENTS