गोहत्या करणा-यांचे हाय पाय तोडायला लावीन, भाजप आमदाराची चिथावणी

गोहत्या करणा-यांचे हाय पाय तोडायला लावीन, भाजप आमदाराची चिथावणी

 

मुझफ्फरनगर –  उत्तर प्रदेशात कडव्या हिंदुत्ववादी विचारांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची शपथ घेऊन दोन चार दिवस होत नाहीत तोवरच भाजपच्या कडव्या हिंदुत्ववादी नेत्यांचा भलताच आत्मविश्वास आलेला दिसतो. भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्या करणा-यांचे हात पाय तोडायला लावेन अशी धमकी दिलीय. विशेष म्हणजे राज्यमंत्री सुरेश राणा यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमातच त्यांनी हे चिथावणीखोर विधान केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलंय.

BJP MLA Vikram Saini says ‘I promised to break limbs of ppl who disrespect and kill cows’ (25.3.17)

राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यावर सुरेश राणा शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये आले होते. राणा यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे आमदार विक्रम सैनी यांची जीभ घसरली. गोहत्येवर भाष्य करत असताना विक्रम सैनी म्हणाले, जी लोक गाईला मानत नाही आणि तिची हत्या करतात, अशा लोकांचे मी हात -पाय तोडायला लावेन अशी धमकीच त्यांनी दिली. तसेच जो वंदे मातरम म्हणत नाही किंवा भारत माता की जय म्हणताना ज्याला अभिमान वाटत नाही त्यांचेही हात- पाय तोडायला लावणार असे ते म्हणालेत.

COMMENTS