प्राणी संवर्धन कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार आता गुजरातमध्ये गोहत्या करणे अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. गुजरात विधानसभेत कायदा दुरुस्ती मंजूर करण्यात आली असून, त्यानुसार आरोपीला कडक शिक्षा होणार आहे.
गुजरात विधानसभेत आज (शुक्रवारी) गोहत्या विधेयक मंजूर करण्यात आले. नवीन विधेयकानुसार गोहत्या करण्यार्याला विनाजामीन आजीवन कारावासाच्या शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड भरवा लागेल. तसंच गोमांसची वाहतूक करणाऱ्यांना 7 ते 10 वर्षाच्या शिक्षेचीही तरदूत करण्यात आली आहे.
प्राणी संवर्धन कायदा 1954 नुसार गोहत्या करणाऱ्याला कमीत कमी शिक्षा होती. मात्र दुरुस्तीनुसार आरोपीला जन्मठेप आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड आकरण्याची तरतूद करण्यात आली आहे.
COMMENTS