ग्रामीण बालविकास केंद्रे पुन्हा सुरु करणार – मुख्यमंत्री

ग्रामीण बालविकास केंद्रे पुन्हा सुरु करणार – मुख्यमंत्री

महिला-बालविकास विभागाने यासाठी विकसीत केलेली प्रणाली निश्चितच कौतुकास्पद आहे. आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी 16 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण बालविकास केंद्रे (VCDC) पुन्हा सुरु केली जातील, असे मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व महिला – बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या बळकटीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये योजना सुरु करण्यात येत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मान्यता देण्यात आली आहे. अशा विविध उपाययोजनांमधून कुपोषण रोखण्यासाठी तसेच कुपोषीत बालकांना पोषण आहार, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

 

COMMENTS