राष्ट्रपतीपदासाठी भाजपनं आज बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं. या निर्णयावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. घटना बदलण्यासाठीच भाजपनं हे दलित कार्ड खेळण्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. रामनाथ कोविंद यांची पार्श्वभूमी आरएसएसची आहे. 2019 नंतर घटनेमध्ये बदल करण्यासाठीच भाजपने ही खेळी केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना आंबेडकर यांनी हा आरोप केला आहे. घटना बदलाचे षडयंत्र पूर्ण करण्यासाठी भाजपने दलित मुखवटा असलेला उमेदवार दिला आहे असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
COMMENTS