शिवसेनेचा पदाधिकारी होता म्हणून अवैध बांधकामाला परवागी मिळाली का ? – अजित पवार

शिवसेनेचा पदाधिकारी होता म्हणून अवैध बांधकामाला परवागी मिळाली का ? – अजित पवार

मुंबई – शिवसेनेचा पदाधिकारी होता म्हणून अवैध बांधकाम करण्याची परवागी मिळाली का ? असा संतप्त सवाल  राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. घाटकोपर येथील साईदर्शन ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 निरपराध लोकांचा बळी गेला आहे. अजित पवार यांनी मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार हा घाटकोपर इमारत दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप केला. शिवसेनेचा पदाधिकारी असल्यामुळे महापालिकेने सुनील शितप याला अभय दिले होते, असा आरोपही त्यांनी केला.  या इमारतीचे महापालिकेने स्ट्रक्चर ऑडीट केले होते का ? इमारतीमधील तळमजल्याच्या नुतनीकरणासाठी महापालिकेने परवानगी दिली होती का ? असे प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केले.
इमारतीच्या तळमजल्यात शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप याने नर्सिंग होमचे अनधिकृतपणे नुतनीकरण सुरू केले होते. हे नुतनीकरण करताना इमारतीचा मुख्य पिलर तोडण्यात आला, त्याबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रारही केली होती. परंतु शितप याने या रहिवाशांना धमकावून गप्प केले होते.

‘मुंबई महापालिका 60-60 हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत, कशाला हळद कुंकु लावायला ठेवी ठेवल्या आहेत का ? ठेव बँकेत ठेवायची व्याज खायचे आणि इथे माणसांना मारायचं या पद्धतीचा मुंबई महापालिकेचा कारभार चाला आहे. यामुळे सत्तधारी पक्षाच्या भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचा मुद्दा समोर आलायं’. असे पवार म्हणाले.

‘इमारत खचून दुर्घटनाग्रस्त झाली, यामध्ये 17 निष्पाप लोकांचा बळी गेला याला जबाबदार कोण’, असा सवालही अजित पवार यांनी केला. ‘मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या उचापतींकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी’, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

 

 

 

 

 

 

 

COMMENTS