चंद्रपूर, लातूर, परभणी महापालिकांच्या निवडणुका जाहीर

चंद्रपूर, लातूर, परभणी महापालिकांच्या निवडणुका जाहीर

राज्यातील तीन महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, लातूर, परभणी आणि चंद्रपूर या तीन महापालिकांचे मतदान 19 एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 21 एप्रिलला जाहीर केला जाणार आहे.त्यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

 

राज्यातील दहा महानगरपालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यानंतर उर्वरित महापालिकांपैकी तीन महापालिकांचे निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. यावेळी सहारिया यांनी सांगितले की, मुदत समाप्तीपूर्वी या महानगरपालिकांच्या निवडणुका घेणे घटनात्मदृष्ट्या बंधनकारक आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची 29 एप्रिल 2017, लातूर महानगरपालिकेची 20 मे 2017, परभणी महानगरपालिकेची 15मे 2017 रोजी मुदत संपत आहे. निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिध्द केलेली विधानसभा मतदार संघाती मतदार यादी या महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

 

धुळे, सांगली पोटनिवडणूक

सांगली- मीरज- कुरवाड महानगरपालिकेत प्रभाग क्र.22 ब, जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 24अ आणि कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र.46 च्या रिक्तपदासाठी देखील 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होईल. 21 एप्रिला मतमोजणी आहे.

 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणूक

धुळे जिल्हा परिषदेच्या शिरुड आणि अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागाच्या तर अकोट पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार आहे. 21 एप्रिला मतमोजणी होईल.

COMMENTS