चैत्री एकादशींला लाखोंचा वैष्णवांचा मेळा, हरिहरांच्या गजराने पंढरी दुमदुमली

चैत्री एकादशींला लाखोंचा वैष्णवांचा मेळा, हरिहरांच्या गजराने पंढरी दुमदुमली

पंढरपूर:   चैत्री एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो वैष्णवांचा मेळा भरला आहे.या यात्रेला येणार भाविक हा शिखार शिंगणापूरला जातो. त्यामुळे पंढरी नगरी हरी आणि हरच्या जयघोषाने दुमदुमून निघाली होती. उन्हांच्या तडाख्यातही एकादशीच्या सोहळयात भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

चैत्री एकादशी निमित्त पहाटे तीन वाजता मंदिर समितीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सपत्नीक विठठलांची नित्यपूजा केली. त्यानंतर रूक्मिणीमातेचीही पूजा झाली. आणि याचावेळी  एकादशींच्या सोहळयास पंढरीमधे सुरूवात झाली. पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. सध्या चंद्रभागेत पुरेसे पाणी असल्यामुळे  भाविकांनी स्नानाचा आनंद लुटला. आणि एकादशीच्या नियमाप्रमाणे पंढरीतील नगरप्रदक्षिणा करण्यास सुरूवात केली. दिवसभर मोठया प्रमाणावर पंढरीत हरि आणि हरांचा गजर  ऐकू येत होता. शिंखर शिंगणापूरच्या शंभू महादेवांच्या अनेक कावडी पंढरीत आल्या होत्या. येथे आल्यावर या कावडींना चंद्रभागेंचे स्नान देखिल घालण्यात येत होते. शिवाय या कावडीसह आज अनेक भाविकांनी एकादशींच्या निमित्ताने नगरप्रदक्षिणा देखिल केली.

या एकादशीला सुमारे दोन लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.विठठलाची पदस्पर्श दर्शन रांग ही गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडच्या जवळ जाउन पोहचली होती. त्यामुळे  विठठलांच्या दर्शनासाठी आज सुमारे ७  तासांचा कालावधी लागत होता.मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दर्शन रांगेमधे सावली करण्यात आली होती. तरी देखिल उन्हांच्या वाढत्या तडाख्यात उष्णतेचा मोठा त्रास हा सहन करावा लागत होता. पंढरपूरची चैत्री यात्रा हि वाळवंटी यात्रा म्हणून संबोधली जाते. त्यामुळे शहरापेक्षा वाळवंटातच सर्वाधिक प्रमाणात गर्दी असलेली दिसून येते. मात्र यंदाची वारी वाळवंटी यात्रेंला अपवाद ठरली. कारण या दिवशी वाळवंटाच्या बरोबरीनेच शहरातही मोठया प्रमाणावर भाविकांचा राबता हा दिसून आला.असे असले तरी सायंकाळी भाविकांनी परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी गर्दी केली.

 

COMMENTS