भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्याने काल (दि.10) भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना तूर खरेदी बाबत लोकांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न केला असता. ‘राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात साले अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी असंवेदनशीलता उघड करुन दाखविली आहे. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा, राज्य सरकारने 1 लाख टन तूर खरेदी केली तरी लोक रडतात, अशी शेतकऱ्यावर त्यांनी टीका केली होती. आज राज्यभरातून यावर तीव्र निषेध व्यक्त केला जात असतानां, रावसाहेब दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, माझे व्यक्तव्य शेतकरीसाठी नव्हते मी कार्यकार्त्यां सोबत संवाद साधत होतो. अशी सारवासरव केली आहे.
दानवे म्हणाले, की शेतकऱ्यांचे दुःख मला माहिती आहे. मी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही. कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये. शेतकऱ्यांची बाजू घेत 35 वर्षे राजकारण केले. शेतकऱ्यांची मने दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.
दरम्यान, आज राज्यभरात ठिकठिकाणी रावसाहेब दानवेंच्या निषेर्धात मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य केल्याबद्दल दानवे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विरोधी पक्षांकडून दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दानवेंविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. अखेर आपण केलेल्या वक्तव्यावर दानवेंना उपरती झाली असून, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
तूर खरेदी केली तरी रडतात…. , दानवेंनी शिवी हासडली, दानवेंची जीभ पुन्हा घसरली
https://goo.gl/D9Mp4H
COMMENTS