“छगन भुजबळांची अवस्था पाहून अश्रू आले, राजकारणात रहावे की नाही?” –  जितेंद्र आव्हाड

“छगन भुजबळांची अवस्था पाहून अश्रू आले, राजकारणात रहावे की नाही?” – जितेंद्र आव्हाड

‘राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रुग्णवाहिकेतून आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अवस्था पाहून डोळ्यात अश्रू आले. त्यांच्याकडे बघून राजकारणात रहावे की नाही, असा विचार ही मनात आला.’ अशी भावना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज व्यक्त केली. राष्ट्रपतीपदासाठी आज राज्याच्या विधिमंडळात मतदान सुरू होते. यावेळी  भुजबळ यांच्याविषयी आव्हाड यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी तुरुंगात असलेले  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज विधान मंडळात राष्ट्रपतीपदाच्या  निवडणुकीसाठी मतदान केले. तुरुंगात असताना आमदार म्हणून आपल्याला  हक्क बजावता यावा यासाठी भुजबळ यांनी न्यायालयाला विनंती केली होती . न्यायालयाने त्यांचा हक्क अबाधित राखत भुजबळ यांना मतदान करण्यास परवानगी दिली होती.  मतदान झाल्यानंतर भुजबळ जेव्हा विधान भवनाच्या बाहेर आले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी  भुजबळ यांचा जयघोष केला. तसेच सरकारने भुजबळ यांच्यावर अन्याय केला असल्याची भावना ही त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली. भुजबळ गेले वर्षभर तुरुंगात आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात अद्याप आरोपपत्र दाखल केले नाही. भुजबळ यांच्या विरोधात हे षढयंत्र असल्याचा आरोप ही त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

 

COMMENTS