राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुजबळ कटुंबियांची तब्बल 300 कोटी रुपयांची संपत्ती ईडीनं जप्त केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या महिन्यात ईडीने देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पैसा हाती लागल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. या छाप्यांमध्ये छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियाच्या तसंच त्यांच्या जवळच्या लोकांच्या घरावरही छापे मारण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे 300 रुपयांची संपत्ती भुजबळ कुटुंबियांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाना आणि मुंबईतील अनेक अलिशान फ्लॅटचा समावेश आहे.
COMMENTS