छेडछाड टाळण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुलींना सांगितला जालीम इलाज !

छेडछाड टाळण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुलींना सांगितला जालीम इलाज !

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या युवा संवाद यात्रा करत आहेत. त्यादरम्यान त्या राज्यातील विविध ठिकाणच्या मुलींशी आणि तरुणींशी चर्चा करत आहेत. आज त्या कोल्हापूरमध्ये होत्या. यावेळी संवाद साधताना त्यांना मुलींनी छेडछाडीबद्दल प्रश्न विचारले. एवढच नाही तर कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या महापौर यांच्या प्रभागातच छेडछाड होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळी महापौर हसीना फरास या सुळे यांच्या शेजारीच बसल्या होत्या. 

 

मुलींच्या या छेडछाडीवर मग सुप्रिया सुळे यांनी मुलींना तुम्हाला वाचवायला कोणी हिरो येणार नाही तर तुम्हीच हिरो व्हा असा सल्ला दिला. तुमच्या पर्समध्ये टाल्कम पावडरच्या डब्यात मिरची पूड ठेवा. म्हणज्ये तुमच्या नादी कोणी लागणार नाही असा जालीम इलाज मुलींना सांगितला.

COMMENTS