दक्षिण काश्मीरमध्ये पुलवामा येथे पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) चे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी यांची आज (सोमवारी) हत्या करण्यात आली. गनी हे श्रीनगरला जात होते. पुलवामा मधील पिंगलान आणि पाहू या गावांदरम्यानच्या मार्गावर आले असता त्यांच्यावर दहशतवाद्यांनी सशत्र हल्ला केला. गनी यांच्या ताफ्यावर गोळ्यांचा मारा केला. या घटनेत गनी गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुगणालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज सकाळीच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून चर्चेने समस्या सोडवून असे मत व्यक्त केले होते. या बैठकीनंतर मुफ्ती यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी पंतप्रधान मोदी काश्मीर प्रश्नी चर्चेला तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काहीवेळाने गनी यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला करून त्यांना ठार मारले. गनी यांनी 1 नोव्हेंबर 2014 ला पीडीपीमधे प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते कॉंग्रेस पक्षात होते.
COMMENTS