जयललितांचं प्रतिकात्मक पार्थिव प्रचारात वापरल्याने संताप !

जयललितांचं प्रतिकात्मक पार्थिव प्रचारात वापरल्याने संताप !

चेन्नई – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आर के नगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत एका उमेदवाराकडून अत्यंत संतापजनक प्रचार केला जात आहे. या निवडणुकीत अण्णा द्रमुकचे दोन गट आमने सामने आले आहेत. शशिकला यांचा एक गट तर त्याविरोधात पन्नीरसेल्वम यांचा दुसरा गट रिंगणात उतरला आहे. पन्नीरसेल्वम गटातर्फे ई मधूसुधन यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांनी जयललितांच्या निधनाची सहानुभूती आपल्या मिळवण्यासाठी चक्क जयललिता यांचं प्रतिकात्मक पार्थिव तयार केलं आहे. त्यांचे कार्यकर्ते ते विधानसभा मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी घेऊन जात आहेत. या प्रकरामुळे मतदारांमध्ये चांगलाच संताप निर्माण झाला असून त्यांना याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS