पाटणा – राज्याच्या विधानसभेत सध्या वंदे मातरम् चा वाद सुरू आहे. तर तिकडे बिहार विधान भवनातील जय श्रीरामच्या घोषणेवरुन वाद सुरू आहे. बिहारचे जेडीयूचे मंत्री फिरोज अहमद यांनी विधान भवनाच्या परिसरात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर मुस्लिम समुदायातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मुस्लिम धर्मगुरुंनी त्यांच्याविरोधात फतवा काढला. अखेर वाद वाढत असल्याचं पाहून अल्पसंख्याक मंत्री असलेल्या फिरोज यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागितली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यामुळे आपण माफी मागितल्याचं फिरोज यांनी सांगितलं. आपण जसं रहिमला मानतो तसं रामालाही मानतो असंही त्यांनी सांगितलं. बिहारच्या जनतेचं कल्याण होणार असेल तर मी हजार वेळा जय श्रीराम म्हणेनं असं सांगत त्यांनी फिरोज यांनी विधान भवनाच्या परिसरात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या.
COMMENTS