दिल्ली – जगभरात अनेक लहान मुलांचे बळी घेणा-या आणि देशातही काही बळी घेऊन झपाट्याने पसरणा-या ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्यात आलीय. केंद्र सरकारनं पत्र लिहून इंटरनेट कंपन्यांना याबाबत आदेश दिले आहेत. तातडीने या गेम्सच्या लिंक काढून टाकाव्यात असं गुगल, फेसबूक, याहू यासारख्या कंपन्याना सरकारने कळवले आहे. या खतरनाक आणि जीवघेण्या खेळाने रशियामध्ये 100 पेक्षा जास्त मुलांचा बळी घेतला होता. मुबंईतही काही दिवसांपूर्वी एका मुलाचा मृत्यू झाला होता. तसच या खेळात रमलेल्या काही मुलांना वाचवण्यात यश आलं होतं. या गेममध्ये मुलांपुढे जीवघेणे टास्ट ठेवले जातात. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.
COMMENTS