जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा बदलण्याची आणखी एक संधी मिळणार ?

जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा बदलण्याची आणखी एक संधी मिळणार ?

जर तुमच्याकडे 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा असतील तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण त्या बदलून मिळण्याची आणखी एक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे अशा जुन्या नोटा आहेत. त्यापैकी काही जणांनी सुप्रीम कोर्टाचा दरवजा ठोठावला होता. आम्हाला 30 डिसेंबर 2016 पर्यंत आमच्याकडील जुन्या नोटा बदलणं शक्य झालं नाही असं सांगत त्या बदलण्याची आणखी एक संधी देण्याची मागणी कोर्टात केली होती. देशाच्या विविध ठिकाणाहून जवळपास 10 याचिका यासंदर्भात दाखल झाल्या होत्या. त्याच्या सुनावणीच्यावेळी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. नोटाबंदीबाबत आणलेल्या अध्यादेशाची मर्यादा वाढवून नागरिकांना नोटा जमा करण्यास पुन्हा एक संधी देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले आहे. जर न्यायालयाने नोटा जमा करण्याचे आदेश दिले तर आम्ही त्या स्वीकारू, असे रोहतगी यांनी म्हटले. ३० डिसेंबरनंतर लोकांना पैसे जमा करण्याची परवानगी का देण्यात आली नाही, असा सवाल न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी सरकारला केला होता. आता यावर सरकारही सकारात्मक असल्यामुळे जुन्या नोटा बदलून घेण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. या प्रकरणावरील पुढची सुनावणी जुनमध्ये होणार आहे.

COMMENTS