8 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. गुजरात, गोवा आणि पश्चिम बंगालमधील 10 राज्यसभेच्या जागांसाठी जून महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक होणार होती. मात्र या निवडणुकीला निवडणूक आयोगकडून स्थगिती देण्यात आली आहे.
राज्यसभेतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माकपचे सचिव सीताराम येचुरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण नेत्यांचा कार्यकाळ जुलै ते ऑगस्ट दरम्यान संपणार आहे. राज्यसभेच्या दहा खासदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन तर माकपच्या एका सदस्याचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने मात्र अद्याप राज्यसभेच्या निवडणुकीची पुढील तारीख जाहीर केलेली नाही.
COMMENTS