जेंव्हा दलाई लामा बाबा रामदेव यांची दाढी पकडतात !

जेंव्हा दलाई लामा बाबा रामदेव यांची दाढी पकडतात !

मुंबईत जागतिक शांतता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत. या परिषदेला अनेक दिग्गज व  नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी तिबेट धर्म गुरु दलाई लामा आणि बाबा रामदेव यांच्यामध्ये एक हास्यपद घटना बघायला मिळाली. जेव्हा एकाच मंचावर दलाई लामा आणि योग गुरु बाबा रामदेव आले. त्यावेळी दलाई लामा यांच्या रामदेव बाबा पाया पडले. तेव्हा  मंचावर दलाई लामा यांनी रामदेव बाबा यांची दाढी पकडली आणि पोटात गुदगुल्या केल्या, त्यानंतर लगेच रामदेव यांनी पोटाचे योगासने करुन दाखवली.

या कार्यक्रम तिबेटचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा म्हणाले की , भितीमुळे चिडचिडपणा निर्मिण होते आणि चिडचिडपणाचे रुपांतर होते व रागामुळे हिंसा निर्मिण होते. तसेच बाबा रामदेव यांनी चीनवर खोच टीका केली. “चीनच्या शांततेवर विश्वास नाही. जर असता तर दलाई लामा येथे नसते. असे  बाबा रामदेव यावेळी म्हणाले.

COMMENTS