जेंव्हा पंकजा आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावर येतात…. !

जेंव्हा पंकजा आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावर येतात…. !

औरंगाबाद – पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं विळ्याभोपळ्याचं सख्या अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची किंवा एकमेकांना अडचणीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळं ते दोघं एखाद्या कार्यक्रमात एकत्र येणं तसं दुरपास्तच…. पण काल हा योग जुळून आला औरंगाबामध्ये. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय भव्य नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी हे दोन्ही नेते एकाच स्टेजवर आले होते…

मग काय चर्चा तर होणारच…. दोन्ही बहिण भाऊ एकमेकांना बोलतात का ?  त्यांच्या भाषणात एकमेकांचा उल्लेख करतात का याकडं सगळ्याचं लक्ष होतं. मात्र ंधनंजय मुंडे यांनी त्यांच्या भाषणात पंकजा यांचं नाव घेतलं नाही. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणात धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं.

COMMENTS