जेडीयूतून 21 नेत्यांची हकालपट्टी !

जेडीयूतून 21 नेत्यांची हकालपट्टी !

जदयूने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन 21 नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नितीश कुमारांचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय जदयूच्या अनेक नेत्यांना पटलेला नाही. ही आघाडी झाल्यापासून सातत्याने पक्षविरोधी सूर लावणारे जदयूचे प्रमुख नेते शरद यादव यांना अखेर शनिवारी राज्यसभेच्या नेतपदावरुन हटवण्यात आले. राज्यसभेतील जदयूचे भाजपा खासदार अली अन्वर यांना सुद्धा हा निर्णय पटलेला नाही.   

गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या विजयानंतर शरद यादव यांनी टि्वटकरुन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. वास्तविक जदयूने या निवडणुकीत भाजपाला साथ दिली होती.

जेडीयूचे संसदीय नेते शरद यादव यांनी सांगितलं की, ‘काही नेता मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी इंदिरा गांधींचाही न घाबरता सामना केला आहे. मग मला घाबरवणारे हे कोण ?. नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी आणि विरोध लोकांसमोर मांडण्यासाठी शरद यादव यांनी राज्यात संवाद यात्रा काढली असून लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी अप्रत्यक्षपणे संयुक्त जनता दलातून बाहेर पडण्याचा सल्ला ज्येष्ठ नेते शरद यादव आणि त्यांच्या समर्थकांना दिला.

COMMENTS