संपूर्ण देशाला डिजिटल बनविण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे, अनेक गावांमध्ये मोबाईलला नेटवर्कदेखील मिळत नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी याचा अनुभव आला. त्यांना मोबाईलचे नेटवर्क मिळविण्यासाठी चक्क झाडावर चढावे लागले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल हे रविवारी राजस्थानच्या बिकानेरमध्ये होते, यावेळी गावकऱ्यांनी मंत्र्यांपुढे आपल्या समस्यांचा पाढा वाचला आणि अधिकारी त्यांचे ऐकत नसल्याचेही सांगितले. म्हणून मेघवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मोबाईलला नेटवर्क नव्हते. त्यावर झाडावर चढल्यास नेटवर्क मिळेल, असे गावकऱ्यांनी मंत्र्यांना सांगितले. त्यानुसार मंत्र्यांसाठी शिडी मागविण्यात आली. या शिडीच्या सहाय्याने मंत्री झाडावर चढल्यावर मोबाईलला नेटवर्क आले आणि त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना ढोलिया गावात लवकर रुग्णालयात नर्सची नियुक्ती करण्याचा आदेश दिला. रुग्णालयात नर्स नसल्याने महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मग अर्जुनराम मेघवाल यांनी झाडावर चढून नर्सची नियुक्ती केली.
COMMENTS