झेडपी अध्यक्षपदासाठी आज निवडणूक; शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीची ‘हात’ मिळवणी

झेडपी अध्यक्षपदासाठी आज निवडणूक; शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीची ‘हात’ मिळवणी

मराठवाड्यातील 8 जिल्हा परिषदेपैकी 4 जिल्हा परिषदेत भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिघेही एकत्र आले आहेत. औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि बीडमध्ये हे चित्र दिसणार आहे. औरंगाबाद, जालना आणि हिंगोलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे शिवसेना सत्तेत येणार आहे. मात्र, बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याने आकड्यांच्या बरोबरीत कोण सत्तेवर येईल याचीच उत्सुकता आहे. या सत्ता संघर्षात केवळ लातूर जिल्हा परिषदेवर भाजपाला स्पष्टपणे एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करता येणार आहे. उस्मानाबाद आणि परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असल्याने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करता येणार आहे, तर नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता येणार आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडणून आलेत, त्याठिकाणी मात्र त्यांना सत्तेपासून शिवसेनेने दूर ठेवले आहे.

 

कशी असणार आहेत सत्तेची समीकरणे ती पाहुयात :

 

औरंगाबाद : भाजप 23, शिवसेना 18, कॉंग्रेस 16, राष्ट्रवादी कॉंग्रेस 3, मनसे 1, अपक्ष 1

सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत; अध्यक्ष शिवसेनेचा असणार.

 

जालना : भाजप 22, शिवसेना 14, कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी कॉंग्रेस 13, इतर 2

सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ; अध्यक्ष शिवसेनेचा तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा.

 

बीड : भाजप20 , शिवसेना 4, कॉंग्रेस 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस 25, इतर 9

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना साथ देणार आहे, मात्र राष्ट्रवादीचे 5 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याने सत्तेचे समीकरण सध्यातरी स्पष्ट होत नाही. दोन्ही गटाकडे समान सदस्य होणार असल्याने ऐनवेळीचं कोण बाजी मारतय, हे पाहावे लागेल.

 

हिंगोली : भाजप 10, शिवसेना 15, कॉंग्रेस 12, राष्ट्रवादी कॉंग्रेस 12, इतर 3

इथे भाजपला साथ मिळणार नाही, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असेल

 

लातूर : भाजप 36, शिवसेना 1, कॉंग्रेस 15, राष्ट्रवादी कॉंग्रेस 5, इतर 1

भाजपला इथे स्पष्ट बहुमत आहे, जे मराठवाड्यातील एकमेव ठिकाणी भाजप सत्तेवर राहील.

 

उस्मानाबाद : भाजप 4, शिवसेना 11, कॉंग्रेस 13, राष्ट्रवादी कॉंग्रेस 26, इतर 1

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्पष्ट

 

परभणी : भाजप 5, शिवसेना 13, कॉंग्रेस 6, राष्ट्रवादी कॉंग्रेस 24, इतर 6.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करणार

 

नांदेड : भाजप 13, शिवसेना 10, कॉंग्रेस 28, राष्ट्रवादी कॉग्रेस 10, इतर 2

नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसची सत्ता

 

COMMENTS