टीएमसीचे खासदार सुल्तान अहमद यांचे निधन

टीएमसीचे खासदार सुल्तान अहमद यांचे निधन

कोलकाता – माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार सुल्तान अहमद (64) यांचे आज निधन झाले.  सुल्तान अहमद यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सकाळी 11.30  वाजता निधन झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र घरीच त्याच निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.सुल्तान अहमद यांच्या घरी त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

15 व्या लोकसभा निवडणुकीत अहमद तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर उल्बेरीया (लोकसभा मतदारसंघ) येथून निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री म्हणूनही काम केले होते.

COMMENTS